विक्रम
भाषणे
ब्रँड ॲम्बेसेडर
साहित्य संपदा
डॉ.स्वाती शिंदे-पवार या व्यवसायाने शिक्षिका, छंदाने वक्त्या, स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि आवडीने उत्तम गृहिणी आहेत. कामगार नेते व सरकारी अधिकारी श्री. अनिल पवार यांच्या त्या पत्नी आहेत, त्यांच्या घराचे नाव 'अक्षरा-शब्दम्' असून हि त्यांच्या मुलांची नावे आहेत.
त्या महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्त्या, सामाजिक व साहित्यिक कार्यकर्त्या आहेत. अक्षय ड्रायक्लीनर्स नांदेडच्या त्या ब्रँड अँबेसेडर आहेत. देशभरातील नामांकित व्याख्यानमाला, साहित्यसंमेलने, चर्चासत्रे, काव्यसंमेलने, क्रीडास्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, स्त्रियांचे प्रश्न, आंदोलने, तंटामुक्ती, पाणी चळवळ, विद्यार्थिनी दत्तक योजना, वृक्षारोपण, पती-पत्नी समुपदेशन, विधवाबंदी इ. अनेक पातळीवर त्यांनी सातत्याने सहभाग नोंदविला आहे, तसेच त्यावर प्रखर आवाज उठविला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून पंचवीस साहित्यसंमेलने त्यांनी संपन्न केली. मुलाच्या वाढदिवसानिम्मित त्या वृक्षवाटप व आरोग्य शिबिरे घेतात.अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या त्या संस्थापिका-अध्यक्षा आहेत. साहित्य संमेलन आणि मूकपट, शॉर्टफिल्मच्या माध्यमातून त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे रौप्यमहोत्सवी साहित्यसंमेलन नेपाळ दूतवासात, बहुभाषिक उत्सव साजरा करून त्यांनी विश्वसंमेलनाचे दमदार पाऊल टाकले आहे. १९९४ पासून दरवर्षी दहा मुलींना शिक्षणासाठी त्या दत्तक घेतात, हा उपक्रम गेली २५ वर्षे त्या राबवित आहेत.
डॉ. स्वाती शिंदे पवार यांनी लघुपटांमधील सशक्त अभिनयाद्वारे समाजपरिवर्तनाचे प्रभावी संदेश दिले आहेत, ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
01डॉ. स्वाती शिंदे पवार यांच्या चित्रपट निर्मितीमध्ये समाजाभिमुख कथा आणि कलात्मक दृष्टिकोनाची उत्तम सांगड घातली आहे. त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर प्रभाव टाकत, प्रभावी संदेश देत समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
02डॉ. स्वाती शिंदे पवार यांच्या नाटयाभिनयाने प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडले आहे. त्यांच्या सशक्त आणि संवेदनशील भूमिकांनी रंगभूमीवर एक वेगळा ठसा उमटवला असून, त्यांनी अभिनयात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
03डॉ. स्वाती शिंदे पवार यांच्या एकपात्री प्रयोगांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे प्रभावी सादरीकरण करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्रभर विशेष ओळख मिळाली आहे.
04राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार जिंकून उत्कृष्ट मराठी वाड्:मय निर्मितीसाठी मान्यता प्राप्त केली आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि ऑस्कर यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून मान्यता मिळवलेले विक्रम, जसे की लावणी डान्स निवेदन आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी २७ वर्षांच्या अक्षरयात्री साहित्य संमेलन आयोजित केली आहे.
भारतीय स्तरावर प्राप्त झालेले मान्यता प्रमाणपत्रे, जसे की सहभागाचे प्रमाणपत्र, कौतुक प्रमाणपत्र, आणि सर्वात लांब कवीतेचे लेखन व वाचन.
Pellentesque sodales convallis dui, in faucibus mauris accumsan Phasellus diam imperdiet fermentum.
Pellentesque sodales convallis dui, in faucibus mauris accumsan Phasellus diam imperdiet fermentum.
Pellentesque sodales convallis dui, in faucibus mauris accumsan Phasellus diam imperdiet fermentum.
Pellentesque sodales convallis dui, in faucibus mauris accumsan Phasellus diam imperdiet fermentum.
3 weeks ago
7 months ago
7 months ago
7 months ago
7 months ago
+९१९८०९६३९९९९
swatipawarshinde@gmail.com
'अक्षरा-शब्दम्' बंगला अक्षरयात्री प्रतिष्ठान, शब्दनगरी, विटा - ४१५३११ जिल्हा-सांगली.