डॉ.स्वाती शिंदे - पवार यांचे कवितासंग्रह, कथा, ललितलेखन प्रसिद्ध आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून अक्षरयात्री प्रतिष्ठान विटाच्या वतीने त्या दरवर्षी साहित्य संमेलन घेतात. सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरा वेळी त्यांनी साहित्यिकांची गावे दत्तक घेऊन त्या गावांमध्ये मदतकार्य केले.
” साहित्यिकांनी उभी करू साहित्यिकांची घरं ” हा प्रकल्प राबविला. त्यांनी गावोगावी व्याख्यानमाला व वाचनालये उभी करण्यासाठी योगदान दिले आहे. मोफत पुस्तके दिली आहेत. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. साहित्य संमेलनांमध्ये त्या हिरीरीने सहभागी असतात. नवीन लेखकांना प्रोत्साहन देऊन त्यांना लिहिते करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचे साहित्य अनेक विद्यापीठातून अभ्यासक्रमात अभ्यासले जाते. शिवाजी विद्यापीठ गीत समितीच्या त्या सदस्या होत्या. महाराष्ट्रभरातून भरणाऱ्या अनेक साहित्य संमेलनाचे संयोजक व व्याख्यानमालांचे संयोजक यांचे त्यांच्याशी घनिष्ठ ऋणानुबंध आहेत. साहित्यिक क्षेत्रात त्यांचा सर्वदूर वावर आहे. सांगली जिल्ह्यातील त्या आघाडीच्या कवयित्री व लेखिका आहेत.
