डॉ.स्वाती शिंदे-पवार

ब्रँड

ब्रँड ॲम्बेसेडर

ब्रँड ॲम्बेसेडर

अक्षयच्या ब्रँड ॲम्बेसेडर शब्दसम्राज्ञी डॉ.स्वाती शिंदे -पवार.

नांदेड, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श शिक्षिका ते सांस्कृतिक संचलनालय न्यू दिल्ली, स्वच्छ भारत शॉर्ट फिल्म उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त कलाकार व साहित्यिक डॉ. स्वाती शिंदे - पवार या अक्षय ड्रायक्लीनर्सच्या ॲम्बेसेडर आहेत. त्यांच्या माध्यमातून कपड्यांच्या स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहोचविला जाणार आहे.

‘सेवा परमो धर्मः’ हे ध्येय समोर ठेवून अक्षय ड्रायक्लिनर्स मराठवाड्यासह राज्यात एक ब्रँड बनला असून ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना, नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.  चाहे आये तुफाँ या मंदी । नही रुकेगी अक्षय की प्रगति ।। नांदेडकरांच्या सेवेत गेल्या २७ वर्षांपासून अक्षय ड्रायक्लिनर्स प्रामाणिकपणे नित्य सेवा देत आहे.  ग्राहकांच्या अक्षय प्रेमामुळे आम्ही आमच्या दहा हजार ग्राहकांना सक्षमपणे सेवा देऊ शकलो. अक्षय ग्राहकांना अविरत व अखंडित सेवा देण्यासाठी सज्ज आहेच पण या नवीन ॲम्बेसेडरमुळे आमच्या व्यवसायाला आणखी उभारी आली आहे अशी माहीती विनोद बाहेती यांनी ठामपणे दिली. गेल्या २७ वर्षांमध्ये आयएसओ, क्रिसल रेटिंग, एमएसएमई, एनएसआयसी यासह दमरेकडून ७ पुरस्कार, विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडून सर्टिफिकेट व अवार्ड स्वकष्टाने प्राप्त केले आहेत. ‘अक्षय’ ग्राहकांच्या सेवेबरोबरच धार्मिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अव्वल असते. गोसेवा, रक्तदान शिबिर तसेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनानिमित्त राष्ट्रध्वजाची निःशुल्क स्वच्छता करून देशसेवेची पूर्ती करीत देशसेवेत अग्रेसर राहिले आहे. कोरोना सारख्या कठीण काळातही आपला व्यवसाय सांभाळत ग्राहकाचे हित जोपासणारे अक्षय ड्रायक्लिनर्स आता एक उत्कृष्ठ स्वच्छतेचा सिम्बॉल बनत चालला आहे. त्यांनी ड्रायक्लिनिंग व्यवसायात घेतलेली गरुडझेप आता मराठवाड्यात अव्वल होऊन महाराष्ट्रात अग्रेसर बनत महाराष्ट्राचा ब्रँड बनण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. 

ब्रँड ॲम्बेसेडर

अक्षयच्या ब्रँड ॲम्बेसेडर | डॉ.स्वाती शिंदे -पवार

’अक्षय’वर मनापासून प्रेम करणार्‍या ग्राहक व मित्रांमुळेच आज आम्हाला ’अच्छे दिन’ पहावयास मिळत आहेत. घराघरात... स्वच्छतेचे प्रत्येकाच्या मनाला महत्व पटवून देण्यासाठी नूतन ॲम्बेसेडर डॉ. स्वाती शिंदे पवार या कटिबद्ध आहेत.

आपल्या नावावर एकाच दिवशी ६ वर्ल्ड रेकाॅर्ड बनविलेल्या डॉ.स्वाती शिंदे – पवार यांनी आता स्वच्छतादूत बनून प्रत्येक महाराष्ट्रीयांपर्यंत कपड्याच्या स्वच्छतेचे महत्त्व पोहोचविण्यास त्या अक्षय ड्रायक्लिनर्सच्या ॲम्बेसेडर म्हणून पुढे सरसावल्या असल्याने ड्रायक्लिनर्सच्या व्यवसायाला महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचविण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा, लेखिका, नाट्य, अभिनय, एकपात्री प्रयोगातून असंख्य पुरस्कार मिळवत आपल्या स्वतःला सिद्ध केलेल्या महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या … डॉ.स्वाती शिंदे – पवार या अक्षय ड्रायक्लिनर्सच्या ॲम्बेसेडर असल्याने अक्षय ड्रायक्लीनर्सला महाराष्ट्रात गरुडभरारी घेण्यासाठी त्या नवा मार्ग मिळवून देतील, अशी आशा व्यक्त होत आहे. नवीन ग्राहकांना आमच्या नव्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डॉ. स्वाती शिंदे – पवार आमच्या व्यवसायाच्या मानबिंदू ठराव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे प्रो. विनोद बाहेती व राजू चौडेकर यांनी स्पष्ट केले.

कला अकादमी विटा

गॅलरी

ब्रँड ॲम्बेसेडर

सुरज ग्रुप नांदेडच्या महिला ब्रँड ॲम्बेसेडर |डॉ.स्वाती शिंदे-पवार.

सुरज ग्रुप बिझनेस कार्यरत फर्टिलायझर विभाग
स्टील विभाग
पॉलिमर विभाग
एचडीपीई विभाग
इन्फ्रा विभाग
ELC ट्रॉनिक विभाग कार्यरत
अखिल भारतीय विपणन उत्पादन कारखाना

कला अकादमी विटा

गॅलरी