डॉ.स्वाती शिंदे-पवार

कारकीर्द

राजकीय कार्य

बाणूरगड(किल्ले भूपालगड)येथील रामजी गायकवाड यांच्या वाड्यात बालपण गेलं. आजोळचा ऐतिहासिक वारसा, माहेरचा ऐतिहासिक आणि राजकीय वसा त्यांनी घेतला आहे. सासरच्या राजकीय आणि पुरोगामी विचारांची त्यात भर पडली.

पती श्री. अनिल पवार महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या अंगाखांद्यावर खेळले आहेत. अनिलरावांचे आजोबा यशवंतरावजी चव्हाण यांचे लंगोटीयार होते. सासरच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी आहे. डॉ .स्वाती शिंदे – पवार माहेरी ज्या वातावरणात वाढल्या ते वातावरण स्त्री स्वातंत्र्याचे नव्हते. लहानपणापासून प्रत्येक पाऊल टाकताना त्यांना बंड करावे लागले. वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, अध्यक्षा अशा गोष्टींची सुरुवात करीत पुढे त्यांनी स्त्री चळवळीमध्ये मानाचे स्थान पटकावले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षा म्हणून सध्या त्या काम पाहतात. अनेक राजकीय पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकारणातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय व्यक्तींच्या त्या सातत्याने संपर्कात असतात. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी बंडखोर स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख होतो. आपल्या ओळखीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची अनेक कामे त्या मार्गी लावतात. “अक्षरा – शब्दम् ” बंगल्यात येणा-जाणाऱ्यांची नेहमी वर्दळ असते. राजकारणातील सर्वांच्या सोबत राहूनही त्यांचे व्यक्तिमत्व अराजकीय आहे.

अभिप्राय

प्रेरणादायी अभिप्राय

न्युज आणि मीडिया

गॅलरी