डॉ.स्वाती शिंदे-पवार

कारकीर्द

सामाजिक कार्य

डॉ. स्वाती शिंदे - पवार यांना सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा माहेर, आजोळ आणि सासर या तिन्ही ठिकाणाहून लाभला आहे. बाणूरगड येथील दारूबंदीसाठी त्यांनी पहिले पाऊल उचलले. त्यानंतर तीन गावात दारूबंदी केली. जरंडी येथील यल्लमा यात्रेत अंगात येणे या प्रथेविरुद्ध त्यांनी पहिला एल्गार पुकारला. परकाळाबंदीसाठी त्यांनी जनजागृती केली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी गावोगावी व्याख्याने दिली आहेत. अनेक प्रयोग करून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात त्या अग्रेसर राहिल्या आहेत.

१९९४ पासून दरवर्षी दहा मुली दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्या करतात. समाजातील अनेक मुला – मुलींची लग्ने ठरविण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. व्यसनमुक्ती, स्त्रियांचे प्रश्न, आंदोलने, तंटामुक्ती, पाणी चळवळ, विद्यार्थिनी दत्तक योजना, वृक्षारोपण, विधवा प्रश्न या विषयात त्या नेहमीच अग्रेसर असतात. विधवाबंदी साठी १९९४ पासून त्या कार्यरत आहेत. पती – पत्नी मधील वाद संपवून त्यांचा सुसंवाद निर्माण करण्याचे कार्य गेली ३० वर्षे त्या करत आहेत. मुलगी अक्षरा हिच्या वाढदिवसानिमित्त गेली २५ वर्षे त्या अक्षरयात्री मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. मुलगा शब्दम् याच्या वाढदिवसानिमित्त त्या वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे आयोजन करतात. शेतकऱ्यांना मोफत झाडांचे वाटप करतात. विद्यार्थी कार्यशाळा घेऊन वक्तृत्व, कथाकथन, अभिनय या क्षेत्रातील शेकडो विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातून त्यांनी अनेक अधिकारी निर्माण केले आहेत. समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य गेली ३० त्या वर्षे त्या करीत आहेत. सांगली जिल्ह्यात महापूर आला तेव्हा तीन गावे दत्तक घेऊन त्या गावांना संपूर्ण मदत देण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. यावेळी अन्नधान्य पुरवठा व कपड्यांची व्यवस्था करण्यात त्यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला. गाव निर्माण अभियानाच्या त्या संकल्पक निर्मात्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावातून त्यांनी व्याख्यानमाला भरविल्या आहेत, वाचनालये उभी केली आहेत. वाचनालयांना स्वतः पुस्तके दिली आहेत. अनेक गावातून रक्तदान शिबिरे घेतली आहेत. कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार सर्वाना ज्ञात आहे. नवउद्योजकांना व महिलांना प्रेरणा देऊन उद्योजक निर्माण करण्यात त्या अग्रेसर आहेत. संपूर्ण भारतभर व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांचे समाज जागृतीचे कार्य चालू आहे.

उपक्रम

वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम

पुरस्कार

सामाजिक कार्य पुरस्कार

न्युज आणि मीडिया

गॅलरी