गेली तीस वर्षे वक्तृत्व, कथाकथन व एकपात्री क्षेत्रात त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र मोहर उमटवली आहे. कवितेच्या क्षेत्रात देशभर त्यांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे. दहा हजाराहून अधिक व्याख्याने त्यांनी महाराष्ट्रभर दिली आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांनी मराठी साहित्य विश्वात स्वतःचा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या कविता व कवितासंग्रह शाळा कॉलेजमधून व विद्यापीठातून अभ्यासक्रमास लागले आहेत. स्त्री जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या कवयित्री व व्याख्यात्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.