डॉ.स्वाती शिंदे-पवार

कारकीर्द

शैक्षणिक कार्य

डॉ.स्वाती शिंदे - पवार यांचा जन्म शिक्षण अत्यावश्यक असणाऱ्या घराण्यात झाला. आपण योग्य शिक्षण घेतले तरच आपल्या घराण्याचा उद्धार होईल हे त्यांनी बालपणापासूनच जाणले होते. आजोबा श्री. बाबुराव गायकवाड (बाणूरगड )प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व पोस्ट मास्तर असल्याने लेखन व वाचन याच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला. त्यांनी एकूण १३ पदव्या प्राप्त केल्या आहेत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या त्या अधीसभा सदस्या होत्या. अनेक शैक्षणिक मेळावे, संमेलने, परिसंवादातून त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. महाराष्ट्रभर त्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतात तसेच मार्गदर्शन वर्ग घेतात. दरवर्षी गोरगरीब दहा विद्यार्थिनी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च त्या करतात. १९९४ पासून त्यांचे हे कार्य सुरू आहे. गरीब मुलींच्या लग्नात त्या वस्तूरूपाने मदत करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनातील कोणत्याही अडचणीत त्या धावून जातात. अगदी आत्महत्या हा पर्याय असणाऱ्या मुलांसाठी त्या देवदूत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलून टाकण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी काम केलेल्या नेलकरंजी, कार्वे, मंगरूळ या गावातील शाळांचा व गावाचा कायापालट करण्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांना २०१७ चा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान केला आहे.

Photoshop
90%
Figma
80%
HTML
85%
CSS
75%
संशोधने

शैक्षणिक संशोधने

पुरस्कार

सन्मानपदे

शैक्षणिक कार्य पुरस्कार

कार्यक्रम

उल्लेखनीय

चर्चासत्रे, परिसंवाद, साहित्यिक उपक्रम, कार्यशाळेतून सहभाग.

आकाशवाणी, दूरदर्शन कार्यक्रम व मुलाखती प्रसारित.

अनेक वर्तमानपत्र व नियतकालिकांमधून कविता, कथा, मुलाखत, लेखी, समीक्षालेखन प्रकाशित.

महाराष्ट्र शासनाच्या शेती विषयक कार्यक्रमांचे नियोजन.

सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित कार्यक्रमात सहभाग.

दैनिक पुढारीतून "याला शाळा ऐसे नाव" लेखमालिका प्रकाशित.

न्युज आणि मीडिया

गॅलरी