डॉ.स्वाती शिंदे-पवार

कारकीर्द

सांस्कृतिक कार्य

डॉ.स्वाती शिंदे - पवार हे सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक वजनदार नाव आहे. कॉलेज वयापासूनच वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन, नाटक, एकांकिका, बायोग्राफी, चित्रपट इ.क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आला आहे. त्यांनी स्वतः व्हीसीडीजची निर्मिती केली आहे.

लघुपट व मूकपटातून भूमिका साकारल्या आहेत. दिशा प्रोडक्शनच्या त्या निर्मात्या आहेत. कलाकार म्हणून नाटकातील भूमिका व एकपात्री प्रयोग त्यांनी साकारले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या आवाजाचा एक चाहतावर्ग आहे. महाराष्ट्रातील एक प्रतिथयश वक्त्या म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आजवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. देशभरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांचे विद्यार्थी विखुरलेले आहे. निवेदनशैली आणि वक्तृत्वाचा त्या एक ब्रँड आहेत. अक्षरयात्री प्रतिष्ठान आणि कला अकादमी विटा यांच्या माध्यमातून उगवत्या कलाकारांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या गेली २५ वर्षे करतात. या दोन्ही संस्थातून अनेक मान्यवर कलाकार घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

पुरस्कार

सांस्कृतिक कार्य पुरस्कार

न्युज आणि मीडिया

गॅलरी