डॉ.स्वाती शिंदे-पवार

कारकीर्द

संस्थात्मक कार्य

अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा (रामापूर)

अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २५ वर्षे त्या मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. अक्षरयात्रीचे साहित्य संमेलन संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात झाले असून आता ते जागतिक पातळीवर संपन्न होते अक्षरयात्रीच्या माध्यमातून त्या विश्वसंमेलन घेतात.

शासकीय इतमामात संपन्न होणारे हे साहित्य संमेलन चर्चेचा विषय ठरतो. संस्थेच्या वतीने दरवर्षी त्या दहा मुली दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च मोफत करतात. आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरे घेतात. शेतकऱ्यांना मोफत झाडांचे वाटप करतात. कर्तबगार स्त्रियांना पुरस्कार देऊन सन्मानित करतात . पुण्यामध्ये सदाशिव पेठेत ४०० कर्तबगार स्त्रियांचा सन्मान करून एका भव्य – दिव्य कार्यक्रमाचे आयोजनही त्यांनी केले आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम अव्याहतपणे सुरू असते. गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या विवाहासाठी ही संस्था मदत करते. पती-पत्नीच्या नात्यातील समुपदेशन करण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. वर्षभर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दिलेल्या व्याख्यानातून आलेले मानधन हाच अक्षरयात्री प्रतिष्ठानचा स्रोत असतो.

कला अकादमी विटा

विटा शहराचा सांस्कृतिक विकास व्हावा व नवोदित कलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने कला अकादमी या संस्थेची स्थापना झाली. गेली २५ वर्षे विटा शहरातील कलाकरांना संस्थेने उत्तम कलामंच मिळवून दिला आहे.

संस्थेचे आजीव सभासद हजार असून त्यांच्यासाठी वर्षातून दोन वेळा उत्तम कार्यक्रमाची मेजवानी असते. बाहेरच्या कलाकारांना उपलब्ध करून एक सहामाही कार्यक्रम आजीव सभासदांसाठी दिला जातो. कोजागिरी महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रातून विटा शहरांमध्ये होणारा स्थानिक कलाकारांचा एकमेव कार्यक्रम आहे. वर्षभर दर पौर्णिमेला घेतल्या जाणाऱ्या स्थानिक कलाकारातून कलाकारांची निवड होते व कोजागिरी दिवशी विविध कलागुणांनी खच्चून भरलेला देखणा अविष्कार दरवर्षी साजरा होत असतो. “कोजागिरी महोत्सव “म्हणजे स्थानिक कलाकार व विटेकर प्रेक्षकांची भरगच्च करमणूकच असते.  स्वतःचे व्याप आणि कला सांभाळून नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे काम या संस्थेचे संचालक मंडळ करते.

कला अकादमी विटा

गॅलरी

विश्वात्मा सोशल असोसिएशन

पर्यावरण, आरोग्य, वृक्षसंवर्धन या गोष्टींना प्राधान्य देणारी विश्वात्मा सोशल असोसिएशन ही संस्था आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्व संचालक मंडळाच्या मदतीने डोंगर दत्तक घेऊन तेथे झाडे लावण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. वर्षभर बियांचे संवर्धन करून त्यापासून रोपवाटिका बनविल्या जातात.

बीज संकलन केले जाते. जास्तीत जास्त बिया जमवणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार प्रदान केला जातो. बिजारोपण व वृक्षसंवर्धन करणारी ही संस्था आहे. संस्थेच्या वतीने पाणी परिसंवाद घेतला गेला. १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. शिबिरामध्ये मोफत तपासणी व औषधोपचार केले जातात. आवश्यक असणाऱ्या गरीब रुग्णांसाठी अनेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात. रामापूर, भांबर्डे, बाणूरगड, विटा, खरसुंडी इत्यादी ठिकाणी विश्वात्मा सोशल असोसिएशन आपली शिबिरे घेत असते. शिबिरांचा लाभ गरजू रुग्णांना चांगला होतो. विटा शहरातील व सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर्स व औषध कंपन्या यावेळी आपला हातभार लावतात.

विश्वात्मा सोशल असोसिएशन

गॅलरी