डॉ. स्वाती शिंदे - पवार यांना सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा माहेर, आजोळ आणि सासर या तिन्ही ठिकाणाहून लाभला आहे. बाणूरगड येथील दारूबंदीसाठी त्यांनी पहिले पाऊल उचलले.
डॉ.स्वाती शिंदे - पवार यांचा जन्म शिक्षण अत्यावश्यक असणाऱ्या घराण्यात झाला. आपण योग्य शिक्षण घेतले तरच आपल्या घराण्याचा उद्धार होईल हे त्यांनी बालपणापासूनच जाणले होते.
डॉ.स्वाती शिंदे - पवार हे सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक वजनदार नाव आहे. कॉलेज वयापासूनच वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन, नाटक, एकांकिका, बायोग्राफी, चित्रपट इ. क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आला आहे.
03डॉ .स्वाती शिंदे - पवार यांचे कवितासंग्रह, कथा, ललितलेखन प्रसिद्ध आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून अक्षरयात्री प्रतिष्ठान विटाच्या वतीने त्या दरवर्षी साहित्य संमेलन घेतात.
04अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली २५ वर्षे त्या मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून साहित्य संमेलनाचे आयोजन करतात. अक्षरयात्रीचे साहित्य संमेलन संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात झाले असून आता ते जागतिक पातळीवर संपन्न होते अक्षरयात्रीच्या माध्यमातून त्या विश्वसंमेलन घेतात.
05
बाणूरगड (किल्ले भूपालगड) येथील रामजी गायकवाड यांच्या वाड्यात बालपण गेलं. आजोळचा ऐतिहासिक वारसा, माहेरचा ऐतिहासिक आणि राजकीय वसा त्यांनी घेतला आहे.